Tarun Bharat

वास्कोतील फेरी हटेना, शहरात प्रंचड गोंधळ व गलिच्छता

Advertisements

कुणाचेही नियंत्रण नाही, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह संपला तरी शहरात भरलेली फेरी हटण्याचे नाव घेत नाही. या फेरीला आज बारा दिवस पूर्ण होत आहेत. केवळ सात दिवसांसाठी भरलेली ही फेरी पंधरा ऑगष्टनंतरच संपण्याची चिन्हे आहेत. या फेरीमुळे शहरात सध्या प्रचंड गोंधळ माजलेला असून या परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शिस्तप्रीय नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.

भजनी सप्ताहानिमित्त वास्को शहरात भरणारी फेरी दरवर्षी सात दिवसांसाठीच असते. मात्र, नंतर वार्षीक पध्दतीने दोन दिवस वाढवून देण्यात येतात. आणि त्यानंतर ही फेरी हटवण्यासाठी दोन दिवस खर्ची पडतात. त्यांना पोलीस आणि पालिकेच्या कामगारांकडून जबरदस्तीनेच हटवण्यात येते. फेरीचा  हा गोंधळ दरवर्षी अकरा दिवसांचा दिसतो. त्यामुळे शहरात वाहतुकीच्या समस्येबरोबरच अनेक समस्या निर्माण होत असतात. गलिच्छताही पसरलेली असते. मागची दोन वर्षे कोरोनामुळे वास्कोत फेरी भरली नव्हती. त्यामुळे यंदा मुरगाव पालिकेने फेरी थाटण्यासाठी बरीच उत्सुकता दाखवली. मात्र, या फेरीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी टाळल्याचे दिसत आहे. शहरात सध्या प्रचंड गोंधळ माजलेला आहे. केवळ सात दिवसांसाठी थाटलेली फेरी आज बारा दिवस झाले तरी हटण्याचे नाव घेत नाही. पालिकेनेच वार्षीक सात दिवस दिले होते. त्यानंतर दोन दिवस अतिरीक्तही दिले. तरीही शहरात भरलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेनेही विशेष कष्ट घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांना पालिकेचेच छुपे सहकार्य असल्याचा आरोप वास्कोत होत आहे.

वास्को शहरात सहाशे अधिकृत फेरीवाले दाखल झाले होते. अनधिकृत संख्या बरीच मोठी आहे. यापैकी काही फेरीवाल्यांनी दहा दिवशी गाशा गुंडाळायला सुरवात केली होती. काही फेरीवाले वास्कोतून गेलेही आहेत. स्वातंत्रपथ मार्गावरील बऱयाच फेरीवाल्यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत जागा खाली केली होती. मात्र, शहरातील जुझे वाझ रस्ता तसेच अंतर्गंत सर्व मार्गावरील फेरी तशीच असून ही फेरी लोकांची गर्दी खेचत आहे. काहीनी दुकाने हटवलेली असली तरी त्यांचा धंदा चालूच आहे. फेरीवाले माल खपवण्यासाठी धडपडत आहेत तर लोक स्वस्तात मिळवण्यासाठी तुटून पडत आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हाच प्रकार चालू होता. या फेरीमुळे वास्को शहरात अद्यापही वाहतुकीसाठी एकाच रस्त्याचा वापर होत असून सुरळीत वाहतुक व वाहने पार्किंगची समस्या भेडसावत आहे. शहरात प्रचंड गोंधळ माजलेला आहे. मात्र, हा गोंधळ दूर करण्यासाठी कोणतीही यंत्रणा फारसे कष्ट घेत असल्याचे दिसत  नाही. आज रविवारी व उद्या स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने फेरीचा हा गोंधळ मंगळवारनंतरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. वास्को शहरातील रस्ते सध्या प्लास्टीक कचरा व अन्य प्रकारच्या गलिच्छतेने व्यापलेला आहे. नागरिकांमध्ये या प्रकाराविरूध्द तीव्र नाराजी पसरलेली आहे.

Related Stories

मराठी साहित्य संमेलनात कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मंजूर

Abhijeet Shinde

कुंकळ्ळीचा गणेशोत्सव धार्मिक सलोख्याचे प्रतीक

Amit Kulkarni

थिवी मतदारसंघात कोविड लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

कोरोनाचा कहर, दिवसभरात 17 बळी

Amit Kulkarni

रुमडामळ घुमट आरती स्पर्धेत साई बोडगेश्वर पथक प्रथम

Amit Kulkarni

पत्रकार सीताराम टेंगसे यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!