Tarun Bharat

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलेला नाही- भारतीय पुरातत्व विभाग

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवमंदिर (Shiva Temple) पाडून त्या ठिकाणी ताजमहाल (Ttaj Mahal) बांधण्यात आल्याचं म्हटलं जातंय. ताजमहालच्या बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या खोल्या असल्याचा दावा हिंदू संघटनाकडून केला जातोय. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नसून, ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. माहिती अधिकार ही माहिती देण्यात आलीय. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. त्यांच्या आरटीआयला भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण उत्तर दिलंय.

भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या या माहितीची दखल न्यायालय आणि जनतेने घ्यावी, असंही साकेत यांनी म्हटलं आहे. तसेच, ताजमहालचा मुद्दा उपस्थित करून भाजप, हिंदुत्त्व गट यांच्याकडून तणाव निर्माण केला जात होता, त्यांचा हा मनसुबा आता खोडून काढला जाईल, असंही ते म्हणाले.

दरम्यन, पहिल्या प्रश्नात साकेत गोखले यांनी ताजमहालच्या जमिनीवर मंदिर सल्याचा पुरावा मागितला होता. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी तळघरातील २० खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींबद्दल विचारले होते. पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना एएसआयने एका शब्दात ‘नाही’ असे लिहिले आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात, तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांची मूर्ती नाही, असे म्हटले आहे.

Related Stories

पक्षातील मित्र व सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये ; मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा

Archana Banage

सांगली : माजी महापौरांसह चौघांचे मृत्यू, नवे 165 रूग्ण

Archana Banage

चांदोली धरणातून विसर्गाला सुरवात : वारणा नदी काठच्या गावांना इशारा, धरण ८३ टक्के भरले

Abhijeet Khandekar

‘एम्स’मधील 35 डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

शौर्य चमकणार, विस्तारवादाचा अस्त!

Patil_p
error: Content is protected !!