Tarun Bharat

राज्यात लम्पी लसीचा तुटवडा नाही

नगर / प्रतिनिधी :

No shortage of lumpy vaccine in the state राज्यात लम्पी लसीचा पुरेसा साठा असून, लसीबाबत कोणतीही कमतरता भासणार नाही, असा निर्वाळा राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी येथे दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार 228 ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी साहित्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नगर शहरात करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मंत्री विखे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात सरकार कोठे आहे, असा उपरोधिक सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री विखे म्हणाले, त्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. सत्ता गेल्याच्या वैफल्यातून ते टीका करीत आहेत.

अधिक वाचा : 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वेदांताच्या मुद्यावरून विद्यमान राज्य सरकारवर करीत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे. त्यांनी अगोदर माहिती करून घेतली पाहिजे. नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत. ज्यांनी प्रकल्प घालवले, त्यांच्या तोंडी राज्य सरकारवर आरोप शोभत नाहीत. किंबहुना तो पोरकटपणा आहे. वेदांता प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. हा प्रकल्प गुजरातला महाविकासआघाडी सरकारच्या निष्क्रीयतेमुळेच गेला आहे. मागच्या अडीच वर्षात त्यांनी राज्यात किती गुंतवणूक आणली, असे विचारले तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. वेदांताचा विषय मागील सात-आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे तो राज्यातून बाहेर जाणे, हे मागच्या सरकारचे पाप आहे. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. पण आता हा प्रकल्प परत येण्याची शक्यता नाही.

निकषानुसार अनुदान देऊ

वेदांताने आश्वासन दिले आहे, की त्यांचा जो पुढचा आन्सलरीचा प्रकल्प ते सुरू करणार आहेत, तो व अन्य प्रकल्प ते महाराष्ट्रात सुरू करणार आहेत. त्यामुळे आताच्या प्रकल्पापेक्षा जास्त गुंतवणूक व रोजगार निर्मिती महाराष्ट्रात होणार आहे. लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी बाधित पशुपालकास वर्गवारीनुसार एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे अनुदान दिले जाईल, असेदेखील मंत्री विखे यांनी सांगितले.

आत्मपरीक्षण करण्याचा पवारांना सल्ला

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे काय काम केले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा सल्लाही विखे यांनी दिला.

Related Stories

व्यापाऱयांचा विरोध पण लॉकडाऊन सुरुच

Patil_p

हंबीरवर हल्ला करणार्‍याच्या शोधात पथके रवाना

datta jadhav

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या शहांना न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

datta jadhav

“अविवाहित लोकांच्या हातात देश; आणि ते लग्नाचं वय ठरवणार”

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात दिवसभरात 6,281 नवीन कोरोनाबाधित

Tousif Mujawar

खंडणी प्रकरणातील ‘त्या’ दोघांना जामीन

Archana Banage