Tarun Bharat

ग्रा.पं.कॉम्प्युटर ऑपरेटरची अद्याप कमतरता

कंत्राटी पद्धतीवर अनेक जण कार्यरत : नागरिकांसमोर समस्या : सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव

ग्राम पंचायतींमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्यामुळे कामाचा खोळंबा होतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने आता संगणक ऑपरेटरसाठी नवीन योजना अंमलात आणली. मात्र या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राम पंचायतींमध्ये संगणक ऑपरेटर नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत तर काही ग्राम पंचायतींमध्ये कंत्राटी पद्धतीवर ऑपरेटर आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रत्येक ग्राम पंचायतीला एक संगणक ऑपरेटर मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या गोष्टीला आता पाच वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही संगणक ऑपरेटरचा प्रश्न ऐरणीवरच आहे. काहीजण तर अजूनही कंत्राटी पद्धतीवरच कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारच्या या आश्वासनाला सारेच वैतागले आहेत. त्यामुळे याकडे आतातरी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक ठिकाणी काही ग्राम पंचायत सदस्यांनी आपल्या मर्जीतील ऑपरेटरांना काम दिल्याने खऱया लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, याबाबतच्या सूचना तालुका पंचायतमधून प्रत्येक ग्राम पंचायतींना देण्यात आल्या होत्या. मागील पाच वर्षांपूर्वीच बेळगाव तालुक्मयात आणखी काही नवीन ग्राम पंचायतींचा भरणा पडला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांचा तुटवडा ही रोजचीच बाब असल्याचे दिसून येत आहे. संगणक ऑपरेटर देण्याबाबत लवकरात लवकर हालचाली सुरू करून तातडीने नेमणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तसे झाले नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कामांचा ताण पिडीओ व इतर कर्मचाऱयांवर पडत असल्याचे उघडकीस आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ज्या व्यक्तीची निवड होईल तो सरकारी नोकर म्हणून कार्यरत राहणार आहे, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी त्यांचा अर्जही घेण्यात आला होता. मात्र सरकारने अजून कोणत्याच हालचाली सुरू केल्या नाहीत. परिणामी जे कर्मचारी लागले आहेत त्यातील बहुतेक जण कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले आहेत. यामध्ये काही जणांची नियुक्तीही करण्यात आली असली तरी बहुतेकांना यापासून दूर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

ही निवड प्रक्रिया ग्राम पंचायतींमध्ये बैठक घेऊन ग्रामसभेत ग्रामस्थ व ग्राम पंचायत यांच्यावतीने ज्यांची निवड करण्यात येईल त्यांना या नोकरीत सामावून घेण्यात येणार होते. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांचा अर्ज तालुका पंचायतमध्ये वर्गीकरण करून तो पुढे जिल्हा पंचायत व नंतर बेंगळूर येथे पाठविण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काहींनी आपले वजन वापरुन निवड करून घेतली असली तरी अजूनही ते कंत्राटी पद्धतीवरच आहेत. ग्राम पंचायतमध्ये वाढत्या कामाचा ताण आता अनेकांवर पडत असल्याने संगणक ऑपरेटरांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

निपाणी पालिकेला विविध मागण्यांचे निवेदन

Patil_p

कर्नाटक हायकोर्टाने केंद्राला रोखले

Archana Banage

शहापुरात वाघनखे, हस्तिदंताच्या अंगठय़ा जप्त

Patil_p

कोल्हापूर जिल्हय़ात पावसाचा कहर

Omkar B

प्रसिद्ध मंदिरांसह घरेही चोरटय़ांचे लक्ष्य

Amit Kulkarni

तुरमुरी-बाची गावच्या महिलांची ता. पं.ला धडक

Amit Kulkarni