चेरी सर्वात दूर थुंकणारा ठरतो विजेता
अमेरिकेला जगातील सर्वात शक्तिशाली आणि विकसित देशांपैकी एक मानले जाते. प्रत्येक प्रकरणी आधुनिक असणाऱया या देशातील लोकांची मानसिकता, जगण्याची पद्धतही आधुनिक असावी. परंतु अमेरिकेत एक विचित्र स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत एका फळाला तोंडात धरून ते थुंकले जाते. सर्वात लांब हे फळ थुंकणाऱया व्यक्तीला विजेता घोषित करण्यात येते. मिशिगनमध्ये आयोजित होणाऱया या स्पर्धेला चेरी पिट स्पिटिंग चॅम्पियनशिप म्हटले जाते. या स्पर्धेत चेरीचे फळ तोंडातून थुंकून बाहेर फेकावे लागते. ही स्पर्धा दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी आयोजित होत असते.
या स्पर्धेची सुरुवात 1974 मध्ये झाली होती. हर्ब टेकमॅन नावाचा एक व्यक्ती ट्री-मेनडस प्रूट फार्मचे मालक होते. त्यांनी ही स्पर्धा मौजमजेच्या स्वरुपात सुरू केली होती. त्यांची ही स्पर्धा हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा प्राप्त करू लागली आहे. आता ही स्पर्धा अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये आयोजित केली जात आहे. अमेरिकेसह आता ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा यासारख्या देशांमध्येही आयोजित होत आहे.
स्पर्धेचे स्वरुप
स्पर्धकाला एका खुणेनजीक उभे करण्यात येते आणि त्याला तीन संधी देण्यात येते. त्याला 3वेळा चेरी खावी लागते आणि त्याचे बीज थुंकावे लागते. जो सर्वात दूर बीज थुंकून फेकतो, तोच विजयी ठरतो. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात अधिक अंतरापर्यंत चेरी थुंकण्याचा मान ब्रायन कौसे यांच्या नावावर आहे.