मुंबई
देशातील विदेशी चलन साठय़ामध्ये पुन्हा एकदा वाढीचा कल दिसून आला आहे. मागच्या आठवडय़ामध्ये विदेशी चलन साठा 600 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करू शकला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील माहिती नुकतीच दिली आहे. 27 मे ला संपलेल्या आठवडय़ामध्ये विदेशी चलन साठा 3.854 अब्ज डॉलर्सने वाढून 601.363 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. या आधीच्या आठवडय़ातही विदेशी चलन साठय़ामध्ये 4.230 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.