Tarun Bharat

गोकुळमध्ये सत्तांतर होणार!… तर आमची खा. मंडलिक यांच्यासोबत युतीची तयारी, खासदार धनंजय महाडिकांचा राजकीय बॉन्सर

Advertisements

dhananjaymahadik- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे बदल निश्चितच जिल्ह्याच्या राजकारणात घडतील. अनेक जण संपर्कात असून जिल्ह्यातील सहकारी संस्थात सत्तांतर होईल, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. ते कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या अडीच वर्षांपासून जे लोक आमच्या सोबत फारकत घेऊन होते. ते आता आमच्या सोबत आले आहेत. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे बदल पहायला मिळतील. अनेकजण संपर्कात असून पक्षात प्रवेश करण्यासाठी संपर्क सुरू आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सरकार निवडून येईल, अशी आशा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. जर खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा विचार पुढे आला तर, आम्ही देखील त्यासाठी इच्छुक आहोत, असेही धनंजय महाडिक म्हणाले.

जिल्ह्यातील सत्ताकेंद्रात बदल
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडणार का? या प्रश्नावर धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. सत्तातरांचा बदल सगळीकडे झालेला पाहायला मिळेल. सर्व सहकारी संस्थावर सत्तांतर होईल असेही महाडिक म्हणाले.

Related Stories

सातारा : अँटीजन किटमुळे फास्ट टेस्टिंग : १०७ बाधित

Archana Banage

एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर,”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”

Archana Banage

वारणा साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ : आमदार विनय कोरे

Abhijeet Khandekar

सचिन वाझेंना ‘एनआयए’कडून अटक

datta jadhav

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन; 50 फूट खोल कालव्यात कोसळली फॉर्च्युनर

datta jadhav

“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, मंत्री दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Archana Banage
error: Content is protected !!