प्रतिनिधी /बेळगाव
दसरा कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव व हुबळी या दोन रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 10 रुपये असणारे प्लॅटफॉर्म तिकीट यापुढे 20 रुपये आकारले जाणारा आहे. यामुळे प्रवाशांच्या सोबत सोडण्यासाठी जाणाऱया नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरती दरवाढ करण्यात आली आहे. दसरा कालावधीत रेल्वेस्थानकांवर मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. प्रवाशांसोबतच त्यांना सोडण्यासाठी येणाऱया नागरिकांची प्लॅटफॉर्मवर गर्दी होते. त्यामुळे बऱयाच प्रवाशांना या गर्दीचा फटका बसतो हे टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात
प्लॅटफॉर्म तिकीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव व हुबळी या दोन्ही मोठय़ा रेल्वेस्थानकांवर 10 ऐवजी 20 रुपये प्लॅटफॉर्म तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे नैर्त्रुत्य रेल्वेकडून कळविले आहे.