Chandrakant Patil : महाराष्ट्रात विद्यापीठ आणि दहावी बारावी परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही. या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडणे असा उद्देश आमचा नाही, पण आम्ही त्याचे प्रश्न सोडवू . लोकशाहीमध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे कौतुक करायचे नसते, टीका करायची असते.अजित पवारांनी त्याचे काम केलं मला खूप आनंद होतोय, एका गिरणी कामगाराच्या मुलांसाठी महाराष्ट्रात बरीच काही चर्चा होतेय ‘मुझे खूप मजा आत्ता है, अस वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापुरात बोलत होते.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या वाट्याच्या असल्या तरी आमच्या तयारीचा ज्याला जागा मिळेल त्याला फायदा होईल.एक बैठक माजी त्याच्याबरोबर झाली आहे. एका बैठकीत सगळं विषय संपतील अस नाही. पण नजीकच्या काळात बैठक घेवून हा प्रश्न कशा प्रकारे सुटेल हे पाहता येईल.अजित दादा आता विरोधी पक्षात आहेत त्यांच्याकडे आता विरोधात बोलण्याशिवाय दुसरे काही नाही.कसबा मधून मी इच्छुक नाही,एका गिरणी कामगाराच्या मुलाला कुठे कुठे घेऊन जाणार काय माहित असे टोला अजित पवारांना चंद्रकांत पाटलांना लगावला.


next post