Tarun Bharat

नोव्हेंबरमध्ये औष्णिक ऊर्जा निर्मितीत 16 टक्क्यांची वाढ

भारतामधील आकडेवारी

नवी दिल्ली

 भारतातील औष्णिक ऊर्जा निर्मिती यावर्षी नोव्हेंबरमध्ये 16.28 टक्क्यांनी वाढून 8,768.7 कोटी युनिट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच महिन्यात ते 7,541.2 कोटी युनिट होती. याशिवाय, नोव्हेंबर, 2022 मध्ये देशातील एकूण ऊर्जा उत्पादन 14.63 टक्क्यांनी वाढून 11,802.9 कोटी युनिट्सवर पोहोचले आहे, जे वार्षिक 10,296.8 कोटी युनिट होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये वीज कंपन्यांकडून कोळसा पुरवठा 3.55 टक्क्यांनी वाढून 6.23 कोटी टन झाला आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात ते 6.02 कोटी टन होते. याशिवाय, देशाचे एकूण कोळसा उत्पादन गेल्या महिन्यात 11.66 टक्क्यांनी वाढून 7.58 कोटी टन झाले आहे, जे गेल्या वर्षी समान कालावधीत 6.79 कोटी टन होते.

कोल इंडियाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये 12.82 टक्क्यांनी वाढले. 37 कोळसा उत्पादक खाणींपैकी 24 खाणींनी 100 टक्क्यांहून अधिक उत्पादन केले. तर 5 खाणींनी 80 ते 100 टक्के उत्पादन केले.

Related Stories

सीईओ सलील पारेख यांच्या वेतनात 27 टक्के वाढ

Patil_p

एव्हेन्यू सुपरमार्टचा नफा 52 टक्के वाढला

Patil_p

मॅक्रोटेक लिमिटेडच्या उत्पन्नात वाढ

Amit Kulkarni

2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार 2,000 अब्ज डॉलर्सवर पोहचणार

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी प्रभावीत

Amit Kulkarni

ऍमेझॉनची कारवाई ; एकाचवेळी 600 चिनी ब्रँड्सवर निर्बंध

Patil_p