Tarun Bharat

वजन नियंत्रणासोबतच हे आहेत ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या नाश्त्यापासून होत असते.पोहे, उपमा ,इडली ,डोसा असे अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात. पण सध्याच्या धावपळीच्या युगात फिट राहण्यासाठी ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.शिवाय ओट्स मधून शरीराला आवश्यक असणारे घटक देखील मिळतात. आजकाल बाजारातही अनेक फ्लेवर्स मध्ये ओट्स उपलब्ध आहेत.चला तर मग जाणून घेऊयात ओट्स खाण्याचे फायदे कोणते आहेत.

वजन नियंत्रित राहते

ओट्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.ओट्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ओट्स खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्यास तज्ज्ञ सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

शुगर नियंत्रित राहते
ओट्स मध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेटची मात्रा पर्याय प्रमाणात आढळून येते. ओट्स हळूहळू पचतात यामुळे रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही आणि शरीरात असलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

पचन क्रिया व्यवस्थित राहते
ओट्समुळे पचनक्रिया व्यवस्थित राहाते. पोटात गॅसेस होत नाही. बध्दकोष्ठताही होत नाही. ओट्समधील फायबर या घटकामुळे पोट स्वच्च राहाण्यास मदत होते. ओट्समुळे आतडेही स्वच्छ राहातात.

हृदयरोगाचा धोका कमी होतो

ओट्स खाल्ल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्यामुळे याचा फायदा हृदयासंबंधित आजारांवर होतो तसेच यामध्ये अँटिऑक्साइड असल्याने अनेक आजारांपासून दूर होण्यास सुद्धा मदत होते

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
ओट्समध्ये जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे ओट्स खाल्ल्याने शरीराची पोषणाची गरज भागते. ओट्समध्ये बीटा ग्लूकल हा घटक असतो. त्याचा फायदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होतो.

Related Stories

अँजिओप्लास्टी केल्यानंतर

Omkar B

सांगली : लाडक्या आजीला झोपेतच मृत्यूने गाठले अन् नातवाचे काळीजच फाटले…

Abhijeet Shinde

रक्तगटानुसार आहारनियोजन

Omkar B

करवंदे खाणे आहे इतके फायदेशीर…

Rahul Gadkar

फायदे वेट ट्रेनिंगचे

Amit Kulkarni

स्मरणशक्ती आणि पुरेशी झोप

Omkar B
error: Content is protected !!