Tarun Bharat

कॅम्प येथील खूनात यांचा समावेश ..!

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : कौटुंबिक वादातूनच कॅम्प येथील रिअल इस्टेट व्यवसायिकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणामध्ये खून झालेल्या रिअल इस्टेट धारकाची पत्नी आणि मुलगीचाही सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बेळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कॅम्प येथील रिअल इस्टेट व्यवसायिक सुधीर भगवानदास कांबळे (वय 57 ) या रिअल इस्टेट व्यावसायिकाचा शनिवार 17 सप्टेंबर रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर आत्महत्या की खून? याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. कॅम्प पोलिसांना मात्र सुधीर याचा खून झाल्याचा संशय होता. त्यानुसार कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी तपास सुरू केला होता.

प्रारंभी पत्नी रोहिणी हिच्यावरच संशयाची सुई गेली होती. त्यानुसार चौकशी केली असता तीने कबुली दिली आहे. यामध्ये तीची मुलगी स्नेहा आणि तीचा मित्र अक्षय महादेव विटकर ( रा. पुणे ) याचाही समावेश असल्याचे आढळून आले. त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सर्वांनी संगणमत करुन सुधीर याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

Related Stories

बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला

Amit Kulkarni

क्वारंटाईन न होता घर गाठलेल्यांचा घेतला शोध

Patil_p

पंचमसाली समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करा

Amit Kulkarni

लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायद्यासाठी कार्यकारिणीत ठराव

Patil_p

मुतगा येथील आठवडा बाजारामुळे सोय

Amit Kulkarni

बेकिनकेरेत 37 पैकी 7 उमेदवारांची माघार

Patil_p
error: Content is protected !!