40 वर्षांपूर्वी सुरू झाली विचित्र परंपरा
अमेरिकेच्या एका गावात लोक टॉयलेट सीटवर बसून रेसिंग करतात. कित्येक वर्षे जुन्या या शर्यतीत लोक टीम तयार करून सामील होतात आणि यामागील कारणही अनोखे आहे. वॉशिंग्टन प्रांतात कॉनकॉनुली नावाचे गाव असून तेथे मागील 42 वर्षांपासून या शर्यतीचे आयोजन होत आहे.
या शर्यतीला आउटहाउस रेस म्हटले जाते, ज्याचे आयोजन मेन स्ट्रीटवर होते. या शर्यतीत टीम तयार करत सहभागी होता येते. टीमचे सदस्य प्रथम एक आउटहाउस तयार करतात. आउटहाउस म्हणजेच एक छोटी खोली जी लाकडांना जोडून तयार केली जाते. या खोलीचा आकार शर्यतीचे आयोजक निश्चित करत असतात. निश्चित आकाराइतकीच ही खोली असणे अनिवार्य आहे. यानंतर या खोलीत टॉयलेट सीट बसविण्यात येते, टॉयलेट पेपर ठेवण्यात येतो आणि टीममधील एक सदस्य सीटवर हेल्मेट परिधान करून बसतो. सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. अखेरीस या खोलीला स्कीजवर ठेवले जाते, स्कीज हे लाकडाच्या लांब पट्टय़ा असतात, ज्याद्वारे बर्फाद्वारे घसरले जाते. स्कीइंग नावाच्या क्रीडाप्रकारात याचा वापर होतो.
42 वर्षांपासून होतेय आयोजन
घराला स्कीजवर ठेवण्यात आल्यावर टीमचे उर्वरित सदस्य त्याला धक्का देतात आणि जे घर फिनिश लाइनपर्यंत पहिले पोहोचते, त्या घराची टीम विजयी ठरते. सुमारे 42 वर्षांपासून अशाप्रकारच्या शर्यतीचे आयोजन होत आहे. मनोरंजन आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी ही शर्यत आयोजित होत आहे. या शर्यतीद्वारे आम्ही कुटुंबाला सोबत जोडून ठेवतो आणि त्यांना एका ठिकाणी एकत्र आणतो, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.