Tarun Bharat

पोटनिवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढावं

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी फोन केला होता. राज ठाकरे यांनीही मविआच्या नेत्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, भाजपने कोल्हापूर आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नव्हती. एक अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे भाजपने डोक्मयातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील. त्यामुळे कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही.

अधिक वाचा : जो उमदेपणा भाजपने दाखवला; तो आता मविआने दाखवावा

कसबा आणि चिंचवडसाठी मविआचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. कसब्याची जागा काँग्रेस लढणार आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, या जागेवर शिवसेनाही आग्रही आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.

Related Stories

Ratnagiri : बारसू आंदोलन तापले- आंदोलकांवर लाठीचार्ज अश्रू धुरांचा वापर

Abhijeet Khandekar

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून दिल्ली प्रदूषणावर चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

Abhijeet Khandekar

वेहेरगावातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; 1600 लीटर दारू जप्त

datta jadhav

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : रासपची मागणी

Patil_p

तोरणमाळमध्ये भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

कोरोना पेक्षा चुकीचा मेडिकेशन प्रोटोकॉल घेतोय जास्त बळी

Patil_p
error: Content is protected !!