Tarun Bharat

घनदाट केसांनी होतेय लाखोंची कमाई

घरात बसून तयार करते व्हिडिओ

काही मुलींचे केस लहानपणापासूनच अत्यंत सुंदर असतात आणि त्यांना केसांबद्दल प्रचंड प्रेम असते. परंतु केसांद्वारे कमाई करण्याचा प्रकार तुम्ही फारच कमी ऐकला असाल. रोजीना मकापॅगल नावाची मुलगी स्वतःच्या लांब केसांचा वापर करून बऱयापैकी कमाई करत आहे. तिला याकरता स्वतःचे केस कापावे लागत नाही, तर ती केवळ स्वतःच्या सुंदर केसांचे व्हिडिओ अपलोड करते आणि पैसे कमावत आहे.

अमेरिकेच्या टस्कन येथे राहणाऱया रोजनीच्या केसांची लांबी 36 इंच असून ते तिच्या कंबरेखाली झुलत असतात. 29 वर्षीय रोजीना प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करत आहे, परंतु तिचे केस तिला अतिरिक्त कमाईची संधी मिळवून देत आहेत. रोजीना ओन्लीफॅन्स साइटवर स्वतःच्या केसांचे व्हिडिओ अन् छायाचित्रे अपलोड करत असते. यामुळे दर महिन्याला तिला सुमारे 40 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होतेय. रोजीनाचे चाहते तिच्या केसांचे व्हिडिओ अपलोड करण्याची विनंती करत असतात. अनेकदा काही लोक केसांना शॅम्पू करतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगतात. एका व्हिडिओसाठी ती 1500-5000 रुपये आकारते. 3 ते 15 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ ती अपलोड करत असते. किशोरवयापासूनच तिने स्वतःचे केस कापलेले नाहीत.

Related Stories

अंगारकी चतुर्थीला ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Tousif Mujawar

बॅलेन्स टेस्टने कळणार तुमचे आर्युमान

Amit Kulkarni

‘ताऊजीं’ची मोहीम फत्ते…

Patil_p

पुणे : दत्तचरणी दवणा वनस्पतीची मनोहारी आरास

Tousif Mujawar

कुटुंबासोबत भोजन करणे आरोग्यदायी

Amit Kulkarni

चीनमध्ये जगातील सर्वात शापित गाव

Patil_p