वृत्तसंस्था/ पॅरीस
रविवारपासून येथील रोलँड गॅरो रेड क्लेकोर्टवर सुरू झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रीयाचा डॉमिनिक थिएम तसेच टय़ुनि†िशयाची सहावी मानांकित महिला टेनिसपटू जेबॉर यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
ऑस्ट्रीयाच्या थिएमने यापूर्वी दोनवेळा प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद तर 2020च्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे थिएमचा 2020 च्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेनंतरचा हा पहिल सामना होता. पुरूष एकेरीच्या झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात बोलिव्हियाच्या हय़ुगो डेलीनने थिएमचा 6-3, 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. बोलीव्हियाच्या डेलिनने तिसऱया ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले आहे. 2019 साली डेलिनने प्रेंच आणि अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत दुसरी फेरी गाठली होती.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या विभागात रविवारी टय़ुनेशियाच्या जेबॉरचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पोलंडच्या 56 व्या मानांकित मॅग्डा लिनेटने जेबॉरचा 3-6, 7-6 (7-4), 7-5 असा पराभव करत विजयी सलामी दिली. 2022 च्या टेनिस हंगामात क्लेकोर्टवरील स्पर्धेंत जेबॉरने दर्जेदार कामगिरी करताना 17 सामने जिंकले तसेच तिने प्रतिष्ठेची माद्रीद टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते पण या वर्षैच्या हंगामातील दुसऱया ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत तिचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.