शहरामधील मारूती मंदिर परिसरातील घटना
रत्नागिरी / प्रतिनिधी
शहरातील मारूती मंदिर परिसरात असलेला बंगला चोरट्यांनी फोडून घरातील सव्वातीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे समोर आले आहे. ही घटना 20 ते 26 सप्टेंबर 2022 दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी शशांक श्रीकृष्ण गांधी (68, ऱा. मारूती मंदिर रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक गांधी हे मारूती मंदिर येथील श्रीकृष्ण स्मृती या आपल्या बंगल्यात वास्तव्य करतात़. 20 सप्टेंबर रोजी शशांक हे कामानिमित्त पत्नीसोबत कोल्हापूर येथे गेले होत़े. यानंतर कोल्हापूर येथील काम आटपल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी ते घरी आले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना आढळल़े. तसेच बेडरूमधील कपाटे उघडी असल्याचेही शशांक यांच्या निदर्शनास आल़े.
घरामध्ये चोरी झाली असल्याबाबत शशांक यांनी शहर पोलिसांत खबर दिल़ी. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल़ा. घरामधील एकूण सव्वातीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले आह़े. पोलीस तपासात चोरटा हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आह़े. घराचे ग्रील उचकटून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केल़ा. त्याचप्रमाणे तब्बल 2 तास चोरटा हा घरामध्ये शोधाशोध करत असल्याचे दिसून आले आह़े.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये डायमंड कुडी, सोन्याचे झुमके, दीड तोळ्याच्या 2 बांगड्या, सोन्याचा हार, चांदीचे ताट, 3 चांदीच्या मूर्त्या व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 26 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल़ा या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करण्यात येत आह़े.