प्रतिनिधी /म्हापसा
हडफडे तांबुडकीवाडा येथे राहणाऱया सौ. रुपाली (चंद्राली) चंद्रशेखर कोरगावकर (वय 35) रा. तांबुडकीवाडा यांचे बुधवारी दीड वाजण्याच्या दरम्यान पिवळय़ा रंगाच्या फसिनो दुचाकीमधून आलेल्या दोघां हेल्मेटधारी अज्ञात चोरटय़ांनी गळय़ातील 8 पवनचे सुमारे 4 लाख किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. भर दुपारी घडलेल्या या चोरीमुळे या भागात भितीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी मंगळसूत्र चोरटय़ाबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन हणजूण पोलिसांनी केले आहे. हणजूण पोलीस स्थानकातील मंगळसूत्र चोरीची ही अलीकडच्या दिवसातील तिसरी घटना असून हडफडे भागातील ही दुसरी घटना आहे अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
अज्ञात चोरटय़ांनी धारदार शस्त्राचा वापर करून हे मंगळसूत्र हिसकावून नेले असून यामुळे रुपालीच्या गळय़ाला किरकोळ जखम झाली आहे. घटनास्थळी रुपालीने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान रुपाली तांबुडकीवाडा हडफडे येथे रिओ रिसोर्ट जवळ शाळेतून सुटलेल्या मुलांना आणण्यासाठी जात असताना पिवळय़ा रंगाच्या फसिनोमधून आलेल्या दोघां अज्ञात चोरटय़ांनी रुपालीच्या गळय़ातील मंगळसूत्र धारदार शस्त्राच्या सहाय्याने हिसकावले व धूम ठोकीत फसिनोमधून पळ काढला. धारदार शस्त्र गळय़ाला लागल्याने रक्तबंबाळ होऊन रुपाली जखमी झाली. तत्पूर्वी त्या चोरांनी रस्त्यातून तीनवेळा फेऱया मारून रस्त्यावर कुणीही नाही याचा अंदाज घेतला होता व कुणी घटनास्थळी नसल्याची संधी साधून मंगळसूत्र हिसकावले. मुलांना घरी घेऊन येत असतानाच घराजवळ पोचता न पोचताच चोरटय़ांनी आपली संधी साधली.
दरम्यान हणजूण पोलिसांनी सीसीटीव्ही पॅमेराच्या आधारे त्या फसिनो गाडीचा नंबर काढला असता चौकशीअंति तो गाडीचा नंबर बनावट असल्याचे आढळून आले आहे. तीन वर्षापूर्वी याच ठिकाणी अशा पद्धतीने चोरटय़ांनी मंगळसूत्र हिसकावून नेले होते त्याचा आजही थांगपत्ता लागलेला नाही. दुपारच्यावेळी या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी तांबुडकीवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
कुत्र्याचा चोरटय़ांना चावा
दरम्यान कोरगावकर यांच्या पाळीव कुत्र्याने त्याच क्षणी त्या पाठीमागे बसलेल्या चोरटय़ाच्या पायाला चावा घेतला मात्र त्याने त्या कुत्र्यावर लाथ मारून बाजूला फेकले व तेथून धूम ठोकली. जर ते चोरटे गाडीवरून खाली पडले असते तर आयतेच सापडले असते अशी माहिती तांबुडकीवाडा येथील नागरिकांनी दिली. यावेळी कुत्र्याने दाखवलेल्या धैर्याचेही नागरिकांनी कौतुक केले.