Tarun Bharat

Kolhapur : तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत

समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

जिह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.

जिह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल (National Portal For Transgender Persons) वर भेट देवून ऍप्लाय ऑनलाईन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत. अधिक माहितीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी कोल्हापूर येथे 0231- 2651318 वर संपर्क साधावा, असेही लोंढे यांनी कळविले आहे.

Related Stories

कोल्हापूर : आजी-माजी मुख्यमंत्री पूर पाहणी दौऱ्यावेळी आमने -सामने

Archana Banage

Kolhapur; सातेरी-महादेव डोंगरावर भाविकांची गर्दी; श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य

Abhijeet Khandekar

आम्हाला काय होतयं? या भ्रमात राहू नका!

Archana Banage

KOLHAPUR; महापुरात सगळंच वाहून जातं, झाडे जाती, तिथं लव्हाळे वाचती, शिंदे गटाला पेडणेकरांचा टोला

Rahul Gadkar

Kolhapur : वाबळेवाडी शाळेला करवीरमधील शिक्षकांची भेट

Abhijeet Khandekar

कसबा बीड गावात गड आला,पण सिंह गेला…; पंचक्रोशीतील गावनिहाय निकाल

Archana Banage