नवी दिल्ली
हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून काँग्रेस सातत्याने अदानी समुहाची चौकशी करण्याची मागणी करत आहे. मध्यप्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव डॉ. जया ठाकूर यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अदानी समुहाने स्वतःच्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य फुगवून जनतेची लाखो-कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा दावा करत ठाकूर यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी एलआयसी आणि एसबीआयची चौकशी केली जावी असे याचिकेत म्हटले आहे.