बेळगाव येथील 78 वर्षीय वृद्धाला जीवदान : हॉस्पिटलच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
बेळगाव येथील नामांकित अरिहंत हॉस्पिटलमध्ये तिसरी टावी शस्त्रक्रिया बेळगाव शहरातील 78 वर्षीय वृद्धावर यशस्वीपणे करण्यात आली. टावी म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ऍरोटिक वॉल्व रिप्लेसमेंट ही अत्यंत अवघड शस्रक्रिया यशस्वीपणे पार करण्यात आली. या शास्त्रक्रियेमुळे रुग्णाची महारोणीची खराब झालेली झडप कोणतेही काटछाट न करता बदलण्यात आली. अरिहंत हॉस्पिटलचे एमडी प्रसिद्ध हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित, डॉ. अमोल सोनवे, डॉ. प्रभू हलकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील रहिवासी रफिक अहमद घीवाले यांच्यावर सुमारे एक ते दीड तास आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्यात आले. रफिक घीवाले यांना 20 दिवसांपूर्वी छातीत दुखत होते. तसेच त्यांना श्वासोच्छ्वासाचाही त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात आल्या. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी रफिक यांच्या वयाचा व ओपन हर्ट सर्जरीऐवजी टावी शस्त्रक्रिया करण्याचा उपाय त्याच्या कुटुंबीयांना सुचविला. यानंतर कुटुंबीयांनी याला संमती देत टावी शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रफिक यांच्यावर सोमवार दि. 9 रोजी सकाळी टावी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना 48 तासात डिस्चार्ज देण्यात आला. ही शस्त्रक्रिया डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अनमोल सोनवे, डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. प्रशांत एम. बी. यांनी यशस्वीरित्या पार पडली. अरिहंत हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील यांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्यासह शस्त्रक्रियेमध्ये सहभागी डॉक्टरांचे कौतुक करून रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली.


काही दिवसातच प्रसिद्धीझोतात आलेल्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये तिसरी टावी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. याअगोदर देशातील दुसरी व कर्नाटकातील पहिली कॅरोटीड आर्टरी शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील सांगोला शहरातील 75 वर्षीय वृद्धेवर, यानंतर गोव्यातील वास्को येथील 77 वर्षीय वृद्धावर तर आता 78 वर्षीय रफिक घीवाले यांच्यावर तिसरी टावी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अरिहंत हॉस्पिटलमार्फत नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. येथे 24 तास गॅस्ट्रो, लिव्हर संबंधी व्याधींवरील उपचारासह भविष्यात लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. याचबरोबर ऑर्थोपेडिक, बेरियाट्रिक, न्यूरो विभागही लवकरच सुरू होणार असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.