This car will be launched soon; Price is only Rs 4 Lakhs
PMV Electric Car ही नवीन कार लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांना इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अधिक पर्याय मिळतील.सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार असो किंवा बाईक ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. याचं कारण म्हणजे कमी पैशांत जास्त सुविधा मिळतात. याकरता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची स्पर्धा सुरू आहे. याबरोबरच या सेगमेंटमध्ये नवीन ब्रँड्सही येत आहेत. याच क्रमाने, लवकरच मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक पीएमव्ही इलेक्ट्रिक कारची (PMV Electric Car) एन्ट्री होणार आहे. कंपनी या महिन्याच्या 16 तारखेला आपली पहिली इलेक्ट्रिक कार Micro Eas-E भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. कंपनीने या कारचे बुकिंगही सुरू केले आहे. पीएमव्हीच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहक केवळ 2,000 रुपयांमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार प्री-बुक करू शकतात. या कारची किंमत सुमारे 4 लाख रुपये असू शकते. सध्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्सची Tiago EV आहे, जी 8.5 लाख रुपयांना मिळते.
सावंतवाडी / प्रतिनिधी