तरुण भारत

या मुलीला पाण्याचीच ऍलर्जी

स्वतःच्या अश्रूंनी देखील होतो दाह, आंघोळ केल्यास जाऊ शकतो जीव

अमेरिकेच्या ऍरिझोनामधील 15 वर्षीय मुलीला पाण्याचीच ऍलर्जी आहे. अबीगैल युर्टिसेरिया आजाराने पीडित आहे. हा अत्यंत धोकादायक आजार असून या समस्येमुळे जगभरात 100 पेक्षा कमी लोक पीडित असल्याचे मानले जाते. या आजाराने ग्रस्त लोकांना डोळय़ांमधून बाहेर पडणाऱया अश्रूंची देखील ऍलर्जी असते. पाणी त्यांच्या शरीरावर ऍसिडप्रमाणे रिऍक्ट करत असल्याने अशा लोकांना अनेक औषधे घ्यावी लागतात.

Advertisements

अबीगैलला स्वतःचे अश्रू आणि घामाचीही ऍलर्जी आहे. तिला यापासून वाचण्यासाठी पूर्ण दिवस घरात थांबावे लागते, शरीराला घाम फुटल्यास पाण्याला स्पर्शही न करता तिची अवस्था बिकट होऊ शकते. तिला कधीच पोहण्याचा आनंद घेता येणार नाही. अबीगैलला जिमनॅस्टिकची आवड आहे, परंतु घाम फुटण्याच्या भीतीने ती यापासून देखील दूर राहते.

हा अत्यंत दुर्लभ आजार असून 20 कोटी लोकांपैकी एकालाच तो होत असता. पाण्याच्या ऍलर्जीचे 100 हून कमी रुग्ण नोंदविले गेले आहेत. पाऊस पडल्यावर माझ्या त्वचेवर ऍसिड ओतल्यासारखे वाटू लागते. मी एक वर्षापेक्षा अधिक काळापासून एक ग्लास पाणी देखील प्यायलेले नाही. एनर्जी ड्रिंक किंवा प्रूट ज्यूसचे पित असते. दिवसात एकदा कमी प्रमाणात पाणी पिऊ शकते आणि याच्या रिऍक्शनला रोखण्यासाठी एंटीहिस्टामाइन आणि स्टेरॉइट घेत असल्याचे अबीगैल सांगते.

प्रारंभी माझ्या शरीरावर पुरळ उठू लागताच आईला केमिकल रिऍक्शन झाल्याचे वाटले होते. परंतु ही स्थिती हळूहळू अधिकच खराब होऊ लागली. मला पाण्याची ऍलर्जी असल्याचे सांगताच लोकांना मी थट्टा करत असल्याचे वाटते असे तिने म्हटले आहे. पाण्याच्या संपर्कात येताच शरीराच्या संबंधित हिस्स्यात पुरळ उठू लागतात, ज्यामुळे प्रचंड वेदना होत असल्याचे तिचे सांगणे आहे.

Related Stories

रशियन वैज्ञानिक बौद्ध भिक्षूंच्या शरणात

Amit Kulkarni

अमेरिकेच्या सर्जनांच्या कामगिरीने जग अवाप्

Patil_p

कित्येक तास काम केल्यावर रडतच घरी परततो!

Patil_p

दिग्गज सीईओंना मागे टाकत वेतन कमाईत महिला सीईओ अव्वल

Patil_p

अमेरिकेत हाहाकार : सलग दुसऱ्या दिवशी 2 हजार लोकांचा मृत्यू

prashant_c

नेपाळची संसद विसर्जित, मध्यावधी निवडणूक होणार

Patil_p
error: Content is protected !!