Tarun Bharat

‘अशी धडकली कार डिव्हायडरला’… ऋषभ पंतनेच सांगितले

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा कार अपघात झाला असून त्यानंतर कारला भीषण आग लागली. याआधी ऋषभ पंत गाडीची विंड स्क्रीन तोडून बाहेर आला होता. त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी ( ३० डिसेंबर ) पहाटे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा कार अपघात झाला आहे. रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात ही घटना घडली. स्थानिक लोकांनी तात्काळ 108 क्रमांकाला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केले.

ऋषभ पंतने सांगितले की, तो स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना त्याला झोप लागली. यामुळेच कार दुभाजकावर आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर तो विंड स्क्रीन तोडून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या शरीरावर कोणत्याही गंभीर जखमा नाहीत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसेच त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऋषभ पंतसोबत झालेल्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

Related Stories

स्पेनची मार्टिनेझ कोरोनाबाधित

Patil_p

पहिली क्रिकेट कसोटी रंगतदार स्थितीत

Patil_p

कांदा झाला कवडीमोल

Archana Banage

ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याचा विचार

Patil_p

हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदरसिंह सुक्खू शपथबद्ध

datta jadhav

प्ले-ऑफ स्थान निश्चितीसाठी लखनौ महत्त्वाकांक्षी

Patil_p