Tarun Bharat

बेळगावला येण्याची ही वेळ योग्य नाही

मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना न येण्याचा संदेश

प्रतिनिधी~ बेळगाव

सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रीय मंत्र्यांच्या बेळगाव भेटीसाठी ही वेळ योग्य नाही, असे सांगत तसा संदेश महाराष्ट्राला पाठविण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे शुक्रवारी विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी रामदुर्ग दौऱ्यावर आले होते. रामुदर्ग येथे पत्रकारांशी बोलताना बसवराज बोम्माई पुढे म्हणाले, दोन राज्यांमध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रीय मंत्र्यांचा बेळगाव दौरा योग्य नाही.

त्यांनी येथे येवू नये, असा संदेश कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठविला आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. त्यावेळी सरकारने जी कारवाई केली होती तशीच कारवाई आताही करणार असल्याचे बसवराज बोम्माई यांनी सांगितले. सीमा समन्वय मंत्र्यांचा दौरा रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे. कोगनोळी तपास नाक्यावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून निपाणी परिसरात 14 तपास नाके उभारण्यात आले

Related Stories

रामतीर्थनगर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

Amit Kulkarni

पाण्याची बचत भविष्यासाठी महत्त्वाची

Omkar B

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Amit Kulkarni

गुरुवारी बेळगाव तालुक्मयात कोरोनाचा एक रुग्ण

Omkar B

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पीएफआयचा रास्तारोको

Omkar B

कामगार कार्डचे वितरण पुन्हा सुरू करा

Amit Kulkarni