Tarun Bharat

पेडणेचे ‘ही श्रींची इच्छा’ प्रथम

बांदोडय़ाचे ‘श्रीमान योगी ’ द्वितीय तर पेडणेचे ‘रणरागिणी ’ तृतीय ; फोंडा कला मंदिरची स्व.रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती नाटय़स्पर्धा

प्रतिनिधी /फोंडा

राजीव गांधी कला मंदिरतर्फे स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृतीप्रित्यर्थ आयोजित तिसऱया अखिल गोवा ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तळर्ण-पेडणे येथील रवळनाथ युनिटी स्पोर्टस् ऍन्ड कल्चरल क्लबच्या ‘ही श्रींची इच्छा’ नाटय़प्रयोगाला रू. 60 हजारांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले. ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचा निकाल काल सोमवारी कला मंदिर येथे जाहीर करण्यात आला. यावेळी कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी, श्रीकांत गावडे व कीर्ती उमर्ये उपस्थित होते.

  स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक ॐ कलासृष्टी नागेशी बांदोडाच्या ‘श्रीमान योगी’ या नाटय़प्रयोगाला तर तृतीय पारितोषिक हळर्ण-पेडणे येथील ओम कला आणि सांस्कृतिक केंद्राच्या ‘रणरागिणी’ यांना प्राप्त झाले. त्य़ांना रू. 50 हजार व रू. 40 हजार अनुक्रमे अशी पारितोषिके प्राप्त झाली. मदनंत सावईवेरेच्या ‘बाजीराव मस्तानी’, कालिका थिएटर्स कळंगुटच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, श्री शांतादुर्गा कला व क्रीडा संस्था वारखंड पेडणेच्या ‘रणांगण’ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

 विलास परब उत्कृष्ट दिग्दर्शक

 उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम-विलास परब (ही श्रीची इच्छा-रवळनाथ युनिटी तळर्ण-पेडणे), द्वितीय शशिकांत नागेशकर (श्रीमान योगी-ॐ कलासृष्टी नागेशी बांदोडा ), तृतीय नीलेश मोहन नाईक-रणरागिणी (ओम कला सांस्कृतिक केंद्र पेडणे) यांना प्राप्त झाले.

 विशाल वामन गवस अभिनय प्रथम

 उत्कृष्ट अभिनय पुरूष भूमिकेसाठी प्रथम-विशाल वामन गवस (श्रीमंत माधवराव पेशवे-ही श्रींची इच्छा, पेडणे), द्वितीयöअमोल नाईक (शिवाजी-श्रीमान योगी, बांदोडा), तृतीय विनायक नागवेकर (शिवाजी-रायगडाला जेव्हा जाग येते, कालिका थिएटर कळंगुट)

 भिमा दिलीप परब स्त्री अभिनय प्रथम

 स्त्री भूमिकेसाठी प्रथम- भिमा दिलीप परब (पद्ममीनी-रणरागिणी, ओम कला हळर्ण पेडणे), द्वितीय स्नेहल गुरव कारखानीस (रमाबाई -ही श्रीची इच्छा, रवळनाथ तळर्ण-पेडणे), तृतीय-श्रद्धा गवंडी  (काशीबाई -बाजीराव मस्तानी, मदनंत सावईवेरे) यांना वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.

  हंसराज परब उत्कृष्ट नेपथ्यकार

 उत्कृष्ट नेपथ्य प्रथम-हंसराज परब-रणरागिणी, द्वितीय तुळशीदास तारी-करिन ती पुर्व. उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम-रजत साळगांवकर-ही श्रींची इच्छा, द्वितीय उमेश कारबोटकर-रणरागिणी. उत्कृष्ट ध्वनी संकलन प्रथम-विजयेंद्र कवळेकर-श्रीमान योगी, द्वितीयöवेद नाईकöही श्रींची इच्छा. उत्कृष्ट वेशभूषा प्रथम-ज्योती बांदोडकर रायगडाला जेव्हा जाग येते, द्वितीयöअमित नाईक-बाजीराव मस्तानी, उत्कृष्ट रंगभूषा प्रथम-जितेंद्र परब-स्वराज धर्म, द्वितीयöसाजरो शेटगावकर-रणांगण, उत्कृष्ट बालकलाकार कु. वेदांत चोडणकरöरायगडाला जेव्हा जाग येते, कु. यशोधन नाईक  -स्वराज धर्म.

  उत्कृष्ट अभिनय प्रशस्तीपत्र पुरूष भूमिकेसाठी-आत्माराम नागेश परब (देवनाथ-रणरागिणी), प्रदीप राजाराम परब (नजीब-रणांगण), रतिश रोहिदास गावडे (व्यंकोजी-गगनात घुमली शिवगाथा), विश्वजित फडते (अफझल-स्वराज धर्म), श्रीनिवास नाईक (फिरंगोजी-श्रीमानयोगी), रत्नाकर परब (शिवाजी- स्वराज धर्म), ईश्वर नाईक (शिवाजी-स्वराज धर्म), नीलेश नाईक (बाजीप्रभू-करिन ती पुर्व), डॉ. प्रज्योती महाले (सिद्धी जोहर-गर्जले सहय़ाद्रीचे कडे), साईराज कळंगुटकर (व्यंकोजी-व्यंकोजी वाघ).

स्त्राr भूमिकेसाठी आरती विजय परब (गजरा-गगनात घुमली शिवगाथा), निवेदीता चंद्रोजी (जिजाबाई-गरूडझेप), शर्वरी देसाई (मस्तानी-बाजीराव मस्तानी), शारदा शेटकर (पुतळा-स्वातंत्र्य यज्ञ), साक्षी नागेशकर (येसू-श्रीमानयोगी), नम्रता नाईक (गजरा-करिन ती पुर्व), पुजश्री प्रकाश पालयेकर (आनंदी-ही श्रींची इच्छा), शिल्पा साखळकर (सोयरा-राजकारण), वैष्णवी राजाराम नाईक (कोयल-रणरागिणी), दीक्षा रायकर (येसू-रायगडाला जेव्हा जाग येते). अभिनय बालकलाकार प्रशस्तीपत्र साईश सागर तिळवे (मोठा राजाराम-रायगडाचा रत्नमणी), संदेश गडेकर (बाल संभाजी -गरूडझेप), व्याम केरकर (समशेर-बाजीराव मस्तानी), साई विकास प्रभू (बाल राजाराम-रायगडाचा रत्नमणी )

स्पर्धेचे परीक्षण अनिल शेट रायकर, गिरीष वेळगेकर, संदीप फडते यांनी केले. 

Related Stories

माजी आमदार लवू मामलेदार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Amit Kulkarni

5 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी फोंडा पालिकेकडून ‘ओटीएस’

Amit Kulkarni

ऊस उत्पादकांची थकलेली रक्कम त्वरीत चुकती करा

Patil_p

हरमल सरपंचपदी मनोहर केरकर यांचा बिनविरोध निवड

Amit Kulkarni

कोरोना – नव्याने 540 रुग्णांची भर

Patil_p

अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांची एकात्मता अधिक सशक्त करणार

Patil_p