तेलंगणात मतदानाचा दिवस नजीक येऊ लागताच काँग्रेस आणि बीआरएस यांच्यातील वाक्युद्ध तीव्र होऊ लागले आहे. दोन्ही पक्षांचे नेते परस्परांवर आरोप करत आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध शायर इमरान प्रतापगढी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर स्वत:च्या शैलीत टीका केली आहे. राज्याची जनता केसीआर यांना बाय-बाय करू पाहत आहे. ‘अब तो तेलंगणा की है यही पुकार, बाय बार केसीआर, बंद करो अपने झूठ का कारोबार, बाय बाब केसीआर’ असे प्रतागढी यांनी एका जाहीरसभेला संबोधित करताना म्हटले आहे. या सभेवेळी काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यावर ‘बाय बाय केसीआर’ अशा घोषणा देण्यात आल्या. इमरान प्रतापगढी हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत.
Previous Articleकेसीआर यांच्या पुत्राला आयोगाची नोटीस
Next Article 26/11 हल्ला कमकुवत सरकारमुळेच
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.