Tarun Bharat

ओबीसीवर अन्याय होऊ नये हीच भूमिका

निवडणुका त्यासाठीच पुढे ढकलण्याचा केला प्रयत्न : मुख्यमंत्र्यांसह भाजप अध्यक्षांनी दिली स्पष्टीकरण

प्रतिनिधी /पणजी

भाजप व सरकार पंचायत निवडणुकीसाठी तयार असून ती टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्यामागे कोणताही स्वार्थी हेतू नव्हता. ओबीसी गटाला निवडणुकीत राखीवता मिळावी म्हणूनच ती पुढे नेण्याचा इरादा होता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिले आहे. ओबीसीवर आरक्षणात अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आणि निवडणुकीत ओबीसीला योग्य ते आरक्षण मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी वर्तविली.

केंद्रातील मोदी सरकारच्या 8 वर्षातील गोवा राज्यासहीत कामकाजाचे ई-बूक डॉ. सावंत यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आले. पणजीतील भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ओबीसी आयोग, पंचायत संचालनालय, समाज कल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसीचा तपशील राज्य निवडणूक आयोगाला येत्या आठवडय़ात सादर करण्यात येणार असून त्याच्या आधारे आयोग ओबीसी आरक्षणाची अधिसूचना काढेल, अशी अपेक्षा डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

कॉमर्स पदवीधरांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण

चार्टर्ड अकाऊटंट इन्स्टिटय़ूट (गोवा शाखा) आणि शिक्षण संचालनालय यांच्यात लवकरच समन्वय करार करण्यात येणार असून त्याद्वारे गोवा राज्यातील कॉमर्स पदवीधरांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. त्याचा फायदा मिळून त्यांना नोकऱयांची संधी मिळेल. चार्टर्ड अकाऊटंट दिनानिमित्त डॉ. सावंत यांनी शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर दिनानिमित्त त्यांना देखील शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांचा आदर सन्मान करा, असेही त्यांना सूचवले.

संपकरी अंगणवाडी सेविकांनी संप मागे घ्यावा आणि पुन्हा संप करणार नाही असे लेखी द्यावे. नंतरच त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. सेवा, सुशासन व गरीब कल्याण संमेलन यावर आधारीत ई-बूकचे प्रकाशन करण्यात आले.

Related Stories

मोपा लिंकरोडसाठी झाडांची कत्तल जोरात

Amit Kulkarni

उघडय़ावर सांडपाणी सोडणाऱयाची नळ व वीज जोडणी कापा-रवी नाईक

Amit Kulkarni

गिरीश चोडणकर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?

Omkar B

आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी घेतला शासकीय कार्यालयाचा ताबा.

Patil_p

सत्तरीतील 400 वीज थकबाकीदारांना नोटिसा

Amit Kulkarni

वाघुर्मे येथील सरकारी विद्यालयाचे नुतनीकरणाला प्रारंभ

Amit Kulkarni