आपल्या सर्वांना कार, दुचाक्या, दागिने, कपडे किंवा तत्सम वस्तूंच्या शोरुम्स माहिती असतात, आणि आपण नेहमी तेथे खरेदी वगैरे करत असतोच, हे प्रत्येकाला माहित आहे. तथापि, राजस्थानची राजधानी जयपूर येथे अन्नू नामक शोरुम अशी आहे, की जिथे 111 प्रकारांची खायची पाने मिळतात. यांपैकी काही पानांची किंमत तर एक ग्रॅम सोन्याइतकी, अर्थात 5 हजार रुपये इतकी असते.


या वैविध्यपूर्ण पानांचा स्वाद चाखण्यासाठी विदेशी पर्यटकही भरपूर प्रमाणात येतात. अभिताभ बच्चन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उद्योगपती राहुल बजाज, लक्ष्मीनिवास मित्तल इत्यादी मान्यवरांनी या पानांच्या शोरुमला भेट दिलेली आहे आणि पानांची चव चाखली आहे. ही शोरुम जयपूरमधून एक महत्वाचे आकर्षण केंद्र बनले आहे. होम डिलिव्हरी करण्याची सोयही आहे. या शोरुमची एक शाखा फिरत्या शोरुमच्या स्वरुपात काम करते. अनेक चित्रपट अभिनेत्रींच्या विवाहात या शोरुममधून पाने आणण्यात येतात, असे सांगितले जाते.