वनप्रशिक्षण केंद्राकडून झाडांचे मोफत वितरण सुरू.
प्रतिनिधी/वाळपई
सत्तरी तालुक्मयाचे वेगवेगळय़ा भागांमध्ये यंदा 1 लाख 65 हजार वनौषधी झाडांची लागवड करण्यात येणार आहे .या संदर्भात वाळपई वन प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून या झाडांची निर्मिती करण्यात आली असून या संदर्भात मोठय़ा प्रमाणात झाडांचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सदर केंद्राचे वनाधिकारी विश्वनाथ पिंगुळकर यांनी दिली.
कोपार्डे येथील नर्सरीमध्ये सदर झाडांची निर्मिती करण्यात आलेली आहे ?.या संदर्भात अधिक माहिती देताना विश्वनाथ पिंगुळकर यांनी सांगितले की गेल्यावषी जवळपास एक लाख झाडांची वितरण करण्यात आले होते ?.सर्व झाडे ही वनौषधी असून सतरी तालुक्मयाच्या जंगल परिसरामध्ये या संदर्भाची लागवड करण्यावर यंदा भर देण्यात आलेली आहे. वन मंत्री विश्वजीत राणे यांनी या संदर्भात विशेष सूचना दिल्या असून जवळपास 1 लाख 65 वनौषधी झाडांची निर्मिती करण्यात आलेली आहे .महत्त्वाचे म्हणजे सदर झाडे ही येणाऱया काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून जी झाडे अत्यंत दुर्मिळ झालेली आहेत त्या झाडांची निर्मिती करण्यात आलेली आहे .त्याचप्रमाणे वनऔषधी झाडाबरोबर फळ निर्मिती करणाऱया झाडांची यामध्ये खास करून समावेश आहे .यामुळे येणाऱया काळात या झाडांची लागवड मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयात झाल्यास रानटी जनावरांचा उपद्रव यापासून शेतकरी बांधवांना काही प्रमाणात सुटका मिळणार असल्याचे पिंगुळकर यांनी स्पष्ट केले आहे.
या झाडांची वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की प्रत्येकाला पाच झाडे मोफत देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शाळा ,कॉलेजेस किंवा कोणत्याही सामाजिक संस्था?ना या संदर्भाची झाडे हवी असल्यास त्यांना 50 झाडे मोफत देण्यात येणार आहेत. मात्र सदर संस्थाकडून या संदर्भाची सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
30 सप्टेंबर पर्यंत या झाडांची वितरण सुरू राहणार आहे .यामुळे ज्यांना या संदर्भाची झाडे हवी असेल त्यांनी या नर्सरीशी संपर्क साधावा असे आवाहन पिंगुळकर यांनी केलेले आहे.
सत्तरी तालुक्मयाच्या जंगल संपत्तीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वनौषधी झाडे होती. एकेकाळी सत्तरी तालुका हा मोठय़ा प्रमाणात वनौषधी झाडानी भरलेला होता .आत परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे?. वनौषधी झाडांची संदर्भात सविस्तरपणे माहिती नसल्यामुळे त्यांचे संवर्धन चांगल्या प्रकारे झालेले नाही .यामुळे वनौषधी झाडांची येणाऱया काळात गरज ओळखून या संदर्भाच्या झाडांची निर्मिती करण्यात आली असून याला नागरिकाकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभेल अशी आशा पिंगुळकर यांनी व्यक्त केली आहे.
सध्या ज्या झाडांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या वनौषधी झाडांमध्ये खास करून अमृतवेल, गंजन, क्लोरोमिंट, वाटय़ाला,अडसूळा, कडुलिंब,दरबा, धुप, शमी, खैर ,रूमड, मलबरी ,आवाकडू, दूधशरी लक्ष्मीचंदू फणस आंबे करमळ भिल्लमाड, तुळशी कडूलिंब यांचा खासकरून समावेश आहे.
जवळपास 150 जातींच्या झाडांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये अनेक महत्त्वा?च्या झाडांचा समावेश असल्याचे पिंगुळकर यांनी स्पष्ट केले आहे.