घरगुती गणेशमूर्तींसोबतच सार्वजनिक मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षात कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. यावषी धुमधडाक्मयात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला आता अवघे दोन महिने शिल्लक राहिल्यामुळे गणेशमूर्ती साकारण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. घरगुती गणेशमूर्तींसोबतच सार्वजनिक गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू आहे.
यावषी 31 ऑगस्टला गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले असल्याने गणेशमूर्ती घडविण्यासाठी तयारी सुरू आहे. माती व शाडूपेक्षा पीओपीच्या मूर्ती वाहतुकीसाठी सोयीच्या असल्याने त्या मूर्तींना मागणी अधिक आहे. आपल्या घरी जो देखावा करायचा आहे त्याप्रमाणे गणेशमूर्तीची ऑर्डर मूर्तीकारांकडे दिली जात आहे. मूर्ती बनविण्यासाठी शाडू, पीओपीचा साठा करण्यात येत
आहे.
बेळगावच्या मूर्तींना गोवा-महाराष्ट्रातही मागणी
बेळगावमधील मूर्तीकार नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार करीत असल्यामुळे इतर राज्यांमधूनही गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. दरवषी इचलकरंजी, गोवा, हुबळी, दावणगेरी, कारवार या भागातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठय़ा गणेशमूर्ती बेळगावमधून बनवून घेतात. यावषीही परराज्यातील अनेक मंडळांनी मोठय़ा गणेशमूर्तींसाठी ऑर्डर दिली आहे. गोवा व हुबळी येथून घरगुती गणेशमूर्तींची ऑर्डर आली असल्याचे बेळगावमधील मूर्तीकारांनी सांगितले.
दोन महिने आधीपासूनच गणेशभक्त मूर्तींच्या ऑर्डर
मागील दोन वर्षात कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. त्यामुळे याचा फटका मूर्तीकारांनाही बसला. यावषी मात्र दोन महिने आधीपासूनच गणेशभक्त मूर्तींच्या ऑर्डर देण्यासाठी येत आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराची व रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याकडे नागरिकांचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक पाटील, मूर्तीकार