Tarun Bharat

कोल्हापुरात यंदा दोन दिवसांचा दसरा महोत्सव

श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रशासनासह संयुक्त आयोजनाला परवानगी : सोहळय़ासाठी ‘जिल्हा नियोजन’कडून 25 लाख निधा : जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती फेरी : पुढील वर्षीपासून तीन दिवस सोहळा : पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

यंदा दसरा महोत्सव दोन दिवसांचा होणार आहे. आदल्या दिवशी नवमीलारथयात्रा काढून दसरा महोत्सवासंदर्भात जागृती केली जाणार आहे. कोल्हापूरची अंबाबाई अन् संस्थानचा शाही दसरा याला धार्मिक, सांस्कृतिक अन् ऐतिहासिक महत्व आहे. म्हैसूरच्या दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरचा दसराही देशभर पोहोचावा, यासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींनी परवानगी दिली आहे. आता छत्रपती घराणे आणि जिल्हा प्रशासनाने पर्यटनाच्यादृष्टीने कोल्हापूरचा शाही दसरा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 25 लाखांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, म्हैसूरचा शाही दसरा कर्नाटकने राज्य उत्सव बनवला आहे. याच धर्तीवर कोल्हापूरचा शाही दसरा महाराष्ट्राचा लोकोत्सव व्हावा, पर्यटनाच्यादृष्टीने त्याचा लाभ व्हावा, यासाठी आपण न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शाही दसरा सोहळा प्रशासनासमवेत संयुक्तपणे साजरा करण्यास त्यांनी संमती दिली. यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपतींची उपस्थिती होती.

हे ही वाचा : पाकिस्तान सरकारच्या Twitter अकाउंटवर भारतात बंदी

शोभायात्रा, प्रबोधनफेरीतून जागृती
पालकमंत्री केसरकर म्हणाले, दसरा सोहळ्य़ासाठी अंबाबाईची पालखी भवानी मंडपाहून निघते, अन् याचवेळी छत्रपती घराण्यातील सदस्य शाही दसऱयासाठी न्यू पॅलेस येथून निघतात. दसरा चौकात सीमेंल्लंघन सोहळा रंगतो, यात काही परंपराही आहेत, याची माहिती देशभर पोहोचण्यासाठी कोल्हापूरचा शाही दसरा राज्याच्या उत्सव व्हावा, यासाठी महोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे प्रयत्न करत आहे.

अंबाबाईची पालखी, शाहूंच्या पुतळ्य़ावर हेलिकॉफ्टरमधून पुष्पवृष्टी
दसऱयादिवशी श्रीमंत शाहू छत्रपती न्यू पॅलेसमधून निघतात, त्यांना दुतर्फा स्काऊट, गाईड, एनसीसीचे विद्यार्थी मनवंदना देणार आहेत. दसऱ्यादिवशी अंबाबाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन आहे.

महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूरचा दसरा सोंहळा लोकसहभागातून करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील या शाही दसऱ्यातील परंपरांची माहिती नव्या पिढीला व्हावी, हा प्रशासनाचा उद्देश आहे. महोत्सव समिती जिल्हा प्रशासनाला दसरा सोहळा आंतरराष्ट्रीय इव्हेंट बनण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

Related Stories

होलिडेन स्कूलची शार्वी पंतप्रधान मोदींशी करणार ‘परीक्षा पे चर्चा’

Archana Banage

जयसिंगपुरात सॅनिटायझर चेंबरची उभारणी

Archana Banage

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची होणार निवड

Archana Banage

जयसिंगपूरात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माजी नगराध्यक्षा कोरोनाबाधित

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी

Archana Banage

शिरोली येथील गोडाऊन फोडून सुमारे सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास, पाच जण अटकेत

Archana Banage
error: Content is protected !!