Tarun Bharat

रिफायनरीचा विरोध करणाऱयांची जंत्री शासनाकडे

पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प आणण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करत आह़े पुढील एक महिन्यात या बाबत महत्वपूर्ण घडामोडी समोर येतील़ काही लोक जाणीवपूर्वक रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत़ या विरोधकांची जंत्री शासनाने प्राप्त केली आहे, असा  इशारा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल़ा

  रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील विश्रामगृह या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होत़े रिफायनरी प्रकल्पाबाबत गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापत असल्याचे समोर येत आह़े याविषयी बोलताना सामंत यांनी सांगितले की, लोकांना समजावण्याची भूमिका शासनाने घेतली आह़े यातून मार्ग काढून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आमदार राजन साळवी व खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी आपल्याला जास्त काही बोलायचे नाही, असे सामंत यांनी यावेळी सांगितल़े

सुरूवातीला 250, नंतर 2 हजारपर्यंत कर्मचाऱयांना कामावर घेणार

मागील 14 वर्षापासून बंद असलेली मिऱया बंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी येत्या महिन्याभरात सुरू करण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत़ ह्युमन मरिन या कंपनीकडून ही कंपनी सुरू करण्यात येणार आह़े सुरूवातीला 250 व नंतर 2 हजारपर्यंत कर्मचाऱयांना कामावर घेण्यात येणार आह़े तसेच ग्रामपंचायतीचे कर स्वरूपातील देय रक्कम 25 लाख रूपये तातडीने देण्याचे कंपनीकडून मान्य करण्यात आले आह़े कर्मचाऱयांचे रखडलेले वेतनही काही प्रमाणात देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितल़े

मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनी पुढील 2 महिन्यात सुरू होणार आह़े तीन वर्षानंतर ही कंपनी आता सुरू होत आह़े सुमारे 100 कोटी रूपयांची गुंतवणूक या ठिकाणी होत आह़े तसेच स्थानिक तरूणांना प्राधान्याने रोजगार देण्याचे वेरॉन व भारती शिपयार्ड कंपनीकडून मान्य करण्यात आले आह़े  भविष्यात दोन्ही कंपन्यांकडून व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्धार करण्यात येणार आह़े त्यामुळे रत्नागिरीतील तरूणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे सामंत यांनी सांगितल़े

             तारांगणचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 डिसेंबर रोजी रत्नागिरीत येत आहेत. सकाळी माळनाका येथील हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार आह़े यानंतर तारांगणचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात येईल़ तसेच एकूण 500 कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आह़े यामध्ये शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कळझोंडी धरण, मिऱया बंधाऱयाचे काम तसेच विमानतळाच्या भूमी अधिग्रहणातील शेतकऱयांना मोबदला रकमेचे वाटप मुख्यमंत्र्यांच्याहस्ते केले जाणार आह़े तर सायंकाळी 4 वा. सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सामंत म्हणाले.

   छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभ्यास करून बोलावे!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेक वक्तव्य केली जात आहेत़ शिवरायांबद्दल सर्वांना अ†िभमान आह़े मात्र वक्तव्य करणाऱयांनी अभ्यास करूनच वक्तव्य करणे गरजेचे आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितल़े

              साळवींच्या नोटीसबद्दल आपल्याला माहिती नाही

आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीसीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाह़ी राजन साळवी हे आपले मित्र आहेत़ त्यांच्याशी जवळीक ही आताची नसून गेल्या अनेक वर्षापासूनच आपले संबंध आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

               पराभवाचे खापर फोडण्यासाठी उद्योगांचे कारण

राज्यातील उद्योग गुजरातला गेल्यामुळे मोदींचा गुजरातमध्ये मोठा विजय प्राप्त झाल़ा या उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना सामंत म्हणाले की, गुजरातमध्ये मोठा पराभव विरोधकांना पत्करावा लागल्याने त्याचे खापर फोडण्यासाठी उद्योग केल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.

Related Stories

दापोली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मनोज भांबीड बिनविरोध

Archana Banage

खेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचा गोंधळ

Patil_p

रेड झोनमधील ट्रक चालकांचा बांद्यात मुक्त संचार

NIKHIL_N

लवकरच देशव्यापी चक्काजाम आंदोलन!

NIKHIL_N

टेनिस बॉल क्रिकेट सिंधुदुर्ग प्रीमिअर लीगचे मालवणात आयोजन

Anuja Kudatarkar

महाकल्पतरूची लागवड अधिकाधिक करा – एम. के. गावडे

NIKHIL_N