Tarun Bharat

दुर्गामाता दौडमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

Advertisements

रविवारी विविध गावांमध्ये मोठय़ा जल्लोषात दुर्गामाता दौड : संपूर्ण वातावरण भगवेमय

वार्ताहर /किणये

पश्चिम भागात दुर्गामाता दौड मोठय़ा उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली. विविध गावांमध्ये सुरू असलेल्या दौडमध्ये रविवारी हजारो कार्यकर्ते सहभागी झालेले दिसून आले. यामुळे सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले आहे. दुर्गामाता दौडच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये  एकात्मतेचे दर्शन घडत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास या दौडच्या माध्यमातून प्रत्येक तरुण व तरुणींच्या मनामध्ये रुजविण्यात येऊ लागला आहे. दौडचे स्वागत करण्यासाठी गल्ल्यांमध्ये आकर्षक रांगोळय़ा घालण्यात आलेल्या होत्या. तसेच भगव्या पताका बांधण्यात आल्या होत्या. तरुण व तरुणींच्या डोक्मयावर भगवे फेटे व हातात भगवे ध्वज यामुळे अनेक गावात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रत्येक गावातील दौडमध्ये तरुण-तरुणी बालचमूंचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने आयोजित केलेल्या या दौडला सर्वच भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहाटे साडेपाचच्या दरम्यान प्रत्येक गावातून त्या त्या गावातील ग्रामदैवत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोरून दौडला प्रारंभ होत आहे.

तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये रविवारची दौडही अभूतपूर्व अशीच ठरली आहे. कारण रविवारच्या दौडमध्ये गर्दी अधिक दिसून आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय’ अशा घोषणांनी अवघा तालुका दुमदुमला होता.

बेळगुंदीत दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगुंदी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रेरणामंत्र म्हणून दौडला सुरुवात झाली. गावातील प्रत्येक मंदिरांना या दौडने भेट दिली. संपूर्ण गावातील गल्ल्यामध्ये आकर्षक अशा रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. महिला या दौडचे आरती ओवाळून स्वागत करीत होत्या तरुण तरुणींसह महिला व बाल मुलींचा या दौडमध्ये लक्षणीय सहभाग दिसून आला.

कर्ले-बहाद्दरवाडीत दौड उत्साहात

कर्ले-बहाद्दरवाडी गावच्यावतीने दुर्गामाता दौड मोठय़ा उत्साहात झाली. प्रारंभी दुर्गामाता दौड संपूर्ण कर्ले गावात फिरली. त्यानंतर ही दौड बहाद्दरवाडी गावच्या वेशीत आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व ध्वज पूजन करून दौडला सुरुवात करण्यात आली. गावातील ब्रह्मलिंग मंदिर व ठिकठिकाणी दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

किणये, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे, पिरनवाडी, मच्छे, बामनवाडी, बाळगमट्टी, नावगे, बिजगर्णी, बेळवटी, सोनोली या गावांमध्ये ही दौड उत्साहात झाली.

राजहंसगडावर चार गावांची दुर्गामाता दौड

रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे राजहंसगड पंचक्रोशीतील सुळगा, देसूर, राजहंसगड, नागेनहट्टी गावातील सर्व हिंदू बांधव, भगिनी यांची एकत्रितपणे दुर्गामाता दौड राजहंसगड किल्ल्यावर उत्साहात काढण्यात आली. दौडीत युवक-युवतींचा अमाप उत्साह दिसून आला.

यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी शिवाजीराव जाधव, हिंदू जनजागृती समितीच्या उज्ज्वला गावडे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हिरामणी मुचंडीकर यांचे ‘हिंदू धर्म आणि राष्ट्र रक्षण’ यावर मार्गदर्शन झाले. यावेळी 800 हून अधिक धारकरी उपस्थित होते.

Related Stories

रामनगर वड्डर छावणीतील घरांची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

स्विटमार्ट – बेकरी पदार्थांवर एक्स्पायरी डेट नाही

Patil_p

हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीचे आवाहन

Amit Kulkarni

शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी पर्याय आवश्यक

Amit Kulkarni

बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालय स्थापन करण्यास सरकारची अनुमती

Tousif Mujawar

उचगाव ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!