वॉशिंग्टन
अमेरिकेत भीषण थंडी तसेच वादळामुळे हजाराहून अधिक विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यातील निम्म्याहून अधिक विमानोड्डाणे ही साउथवेस्ट एअरलाइन्स कंपनीची आहेत. या कंपनीला जानेवारीच्या प्रारंभी खराब हवामान आणि तांत्रिक त्रुटीमुळे 16,700 विमानोड्डाणे रद्द करावी लागली होती. 11 जानेवारी रोजी अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाली होती. नोटिस टू एअर मिशन्स सिस्टीममधील बिघाडामुळे हा प्रकार उद्भवला होता.