प्रतिनिधी / बेळगाव : मागील पाच दिवसांपासून काकतिवेस रोडवर हजारो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसत आहे.
एकीकडे शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यजलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात आहे.