संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी, आमदार आरोलकरांकडून घटनास्थळाची पाहणी
प्रतिनिधी /मोरजी
मांदे जुनसवाडा येथील डोंगर माळरानावर एका कंत्राटदाराच्या कामगारांनी आग लावून हजारो झाडांची नुकसानी केली. या प्रकरणी तक्रार स्थानिकांनी वनखाते आणि पोलिसांकडे केली आहे. स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झाडांची पाहणी केली. संबंधित कंत्राटदारावर तक्रार नोंदवण्याची सूचना त्यांनी पोलिसांना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुनसवाडा मांदे येथील किमान साडेसात लाख चौरस मीटर सरकारची जागा आहे. त्याच जागेत आता वीज उपविभागीय कार्यालय होणार आहे. या जागेत देवरुख या पर्यावरण निसर्गप्रेमी संस्थेने एकूण सत्तर हजार पेक्षा जास्त झाडे बायोडायव्हर्सिटी महामंडळ आणि वन खात्याच्या सहकार्यातून लावली होती. मागच्या पाच वर्षापासून या डोंगर माळरानावर कार्यकर्त्यांनी देवरुख संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झाडांना पाणी देऊन ती झाडे वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान मंगळवार दि. 17 रोजी त्या जागेची साफसफाई करण्यासाठी पणजी येथील एका खासगी संस्थेला कंत्राट दिले होते. त्या कंत्राटदाराच्या साईड इंजिनियरने या ठिकाणी सहा कामगारांना घालून साफसफाईचे काम सुरु केले. परंतु दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कामगारांनी परिसरातील वाळलेल्या कुरणाला आग लावल्याने हजारो झाडे जळून गेली. या घटनेची माहिती स्थानिकांनी वनखाते व पोलिसांनाही दिली. शिवाय अग्निशामन दलालाही माहिती दिली असता घटनास्थळी बंब हजर झाला. परंतु डोंगर माळरानावर जाण्यासाठी मार्ग नसल्याने दलाच्या जवानांना माघारी फिरावे लागले. यावेळी काही नागरिकांनी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांना माहिती दिली.
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा : जीत आरोलकर
आमदार जीत आरोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळ ते म्हणाले, या जागेत वीज उपविभागीय कार्यालय होत आहे. जागेची साफसफाई करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले होते. परंतु त्या कंत्राटदाराने स्थानिक पंचायत, स्थानिक वीज अधिकाऱयांना कळवणे आवश्यक होते. आपल्यालाही या विषयी माहिती दिली नाही. हे काम करत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हजारो झाडे जळून खाक झाली. कंत्राटदाराने पावसाळय़ात झाडे लावून ती वाढवून देण्याची जबाबदारी घ्यावी. शिवाय संबंधित कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी.
वनखात्याच्या अधिकाऱयांनी पूर्ण जागेची पाहणी करून पंचनामा केल्यानंतर देवरुख संस्थेच्या काही पदाधिकाऱयांनी अधिकाऱयांना जाब विचारला. त्यावर अधिकाऱयांनी आम्ही वरि÷ अधिकाऱयांना या विषयी माहिती देणार आहोत. आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही. ही जागा सरकारची असल्याने त्यावर योग्य तो निर्णय आमचे वरि÷ अधिकारी घेतील असे संबंधित अधिकाऱयाने सांगितले.
यावेळी घटनास्थळी गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, मांद्रेचे सरपंच प्रिया कोनाडकर, माजी सरपंच महेश कोनाडकर, पंच संतोष बर्डे, वृक्ष संस्थेचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आग लावण्याचा प्रकार निंदनीय : संतोष बर्डे
मांदेचे माजी सरपंच तथा पंच सदस्य संतोष बर्डे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना युवकांनी त्या ठिकाणी हजारो झाडे लावली होती. त्या झाडांनाच भस्मसात करण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून कंत्राटदारांवर कारवाई होण्याबरोबरच s त्यांनी ती झाडे पुनर्जीवित करावीत.
कंत्राटदारावर कारवाई करावी : दीपक कळंगूटकर
साफसफाई करत असताना कंत्राटदाराने काळजी घेणे आवश्यक होती. कंत्राटदाराने काळजी न घेता आग लावल्याने पूर्ण डोंगर जळून खाक झालेला आहे या सर्व प्रकारची नुकसानी कंत्राटदाराकडून वसूल करावी, अशी मागणी दीपक कळंगुटकर यांनी केली आहे.