Tarun Bharat

उत्खननात सापडला हजारो वर्षे जुना ‘दैत्य’

Advertisements

30 हजार वर्षे जुना वुली मॅमथ

कॅनडाच्या युकोनमध्ये एका बेबी मॅमथचा शोध लागला असून तो 30 हजार वर्षांपूर्वी जिवंत होता. हा उत्तर  अमेरिकेत शोधण्यात आलेला सर्वात पूर्ण मॅमथ असलयाचे तज्ञांचे मानणे आहे. या बेबी मॅमथचे नाव ‘नुन चो गा’ आहे. हान भाषेत याचा अर्थ ‘बिग बेबी ऍनिमल’ असा होता. हा मॅमथ पर्माफ्रोस्टमध्ये गोठलेला होता, याचमळे त्याचे अवशेष सुरक्षित राहिले आहेत.

पर्माफ्रोस्ट पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा त्याखालील भूमीला म्हटले जाते, ज्याचे तापदान दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी सातत्याने शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहते. क्लोंडाइक गोल्ड फील्ड्समध्ये काम करणाऱया कामगारांनी या मॅमथचा शोध लावला आहे. मॅमथची त्वचा अद्याप पूर्वीसारखीच असल्याचे आणि केसांचे काही तुकडे अद्याप शरीरावर चिकटलेले असल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येते.

गुहांमध्ये होते वास्तव्य

विस्तृत तपासणीत हा मॅमथ मादी असून जंगली अश्व, सिंह आणि विशाल स्टेपी बाइसनसोबत राहायची असे आढळून आले आहे. युकोनमध्ये हजारो वर्षांपूर्वी हे प्राणी अस्तित्वात होते. युकोन नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आइस ऐज आणि बेरिंगिया संशोधनासाठी ओळखले जाते. आम्ही संरक्षित बेबी वुली मॅमथ ‘नुन चो गा’च्या अत्यंत महत्त्वपूर्ण शोधामुळे आनंदी झालो आहोत असे कॅनडाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री रंज पिल्लै यांनी म्हटले आहे.

शरीर सुरक्षित स्थितीत

युकोन सरकार आणि खाणीत काम करणाऱया कामगारांमधील भागीदारीशिवाय अशाप्रकारचा शोध शक्य झाला नसता असेही त्यांनी नमूद केले आहे. नून चो गा पायावर पाय ठेवलेल्या स्थितीत असून त्याचे दोन्ही डोळे बंद आहेत. याची मजबूत सोंड आता कमजोर झाली आहे. मॅमथच्या अत्यंत चांगल्याप्रकारे संरक्षित शरीराने तज्ञांना चकित केले आहे. याची त्वचा आजही एखाद्या जिवंत प्राण्यासारखी असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

आजारांना हुंगणारे ‘नाक’

Patil_p

क्षेपणास्त्र पाहताच चिनी विमानांनी काढला पळ

Patil_p

अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ल्याचा चीनचा कट

Patil_p

चीनचा दूतावास बंद करण्याचा आदेश

Patil_p

जगभरात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांसमीप

datta jadhav
error: Content is protected !!