ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कोरेगाव परिसरात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञाताने मुंबईतील गुगलच्या ऑफिसमध्ये फोन करुन ही धमकी दिली होती. त्यामुळे कोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली होती.
धमकीच्या फोननंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकाने रात्री कोरेगाव पार्क येथील गुगलच्या ऑफिससह संपूर्ण इमारतीची तपासणी केली. मात्र कोणत्याही प्रकाराची बॉम्बसदृश्य वस्तू मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी 45 वर्षीय नागरिकाला हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने दारूच्या नशेत हा कॉल केला होता. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच रागातून त्याने भावाला त्रास व्हावा, म्हणून दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
अधिक वाचा : फोन टॅपिंगमुळे वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती