ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Threatening call to Arvind Kejriwal दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यरात्री 12.55 मिनिटांनी एका व्यक्तीने केजरीवाल यांना पीसीआर कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीनंतर केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून दिल्ली पोलिसांत तक्रार करण्यात आली.
दिल्ली पोलिसांना यासंदर्भातील तक्रार प्राप्त होताच त्यांनी तपासाची सूत्रे फिरवली. काही वेळातच पोलिसांनी धमकी देण्याचा शोध घेतला. मात्र, फोन करणारा व्यक्ती मतिमंद असून, त्याचे मन अस्वस्थ असल्याचे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. संबंधितावर गुलाबीबाग येथे उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार