Tarun Bharat

नितीन गडकरींना धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगातून…

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे दोन कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गडकरी यांना धमकीचे तीन फोन आले होते. हे फोन परदेशातून नव्हे तर बेळगावच्या तुरुंगातून आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

जयेश पुजारी असे गडकरींना धमकी देणाऱ्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून सध्या बेळगावच्या तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगात त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गँगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. 

गडकरींच्या खामला परिसरातील कार्यालयात शनिवारी सकाळी 11.30 आणि दुपारी 12.40 वाजता हे धमकीचे फोन आले होते. या फोनमध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेख करत दोन कोटी रुपये द्या अन्यथा ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. धमकीनंतर गडकरींचे कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली होती. 

Related Stories

होनगा येथे दरपत्रक बॅनरचे अनावरण

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱयाला 10 वर्षांचा कारावास

Amit Kulkarni

महाराष्ट्र : गेल्या 24 तासात 533 पोलिसांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट प्रकाशित करा

Abhijeet Khandekar

डॉ. राजश्री अनगोळ यांचा जायंट्स सखीतर्फे सत्कार

Amit Kulkarni

नदीकाठावर पुन्हा धास्ती वाढली

Patil_p