Tarun Bharat

गादीमध्ये लपवून दारुची तस्करी

सोलापूरातील तस्कर टोळीचे सदस्य जेरबंद : एक टेम्पो, अलिशन कारसह 120 मद्याचे बॉक्स जप्त : राज्य उत्पादन शुल्कची उजळाईवाडी नजीक कारवाई

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

टेम्पोच्या हौद्यामध्ये गाद्या, खुर्च्यांमध्ये लपवून गोवा बनावटीच्या दारुची तस्करी करणाऱया तीघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 1 टेम्पो, 1 अलिशान कार, 120 मद्याचे बॉक्स असा सुमारे 18 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जफ्त केला. वैजनाथ चन्नाबसफ्पा ढंगापुरे (वय 35 रा. वालचंद कॉलेज, सोलापूर), अजय विलास लोंढे (वय 29 रा. लक्ष्मीनगर बाळे, सोलापूर), अर्जुन रमेश कांबळे (वय 27 रा. मुळेगाव, दक्षिण सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची कोल्हापूर मार्गे सोलापूरपर्यंत छुफ्या पद्धतीने तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आजरा परिसरात नाका तपासणी सुरु केली होती. यादरम्यान एक मालवाहतूक टेम्पो भरधाव वेगाने पुढे गेल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच या टेम्पोच्या पुढे काही अंतरावर एक अलिशान मोटार पेट्रोलिंगसाठी असल्याचे दिसून आले. भरारी पथकाने या मोटारीचाही पाठलाग सुरु ठेवला. उजळाईवाडीनजीक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कार व टेम्पोला पकडले. टेम्पोच्या हौद्यामध्ये खुर्च्या, गाद्यांच्या खाली दारुचे बॉक्स लपविल्याचे दिसून आले.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक राजाराम खोत, यांच्या मार्गदर्शनाखली भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, रणजित येवलुजे, गिरीशकुमार कर्चे, सचिन काळे, मारुती पोवार, संदीप जानकर, राजेंद्र कोळी, अमोल यादव, विलास पोवार, सुशांत बनसोडे, जय शिनगारे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

कोल्हापूर : ई वॉर्डातील ८ प्रभागात बायपासने पाणीपुरवठा

Abhijeet Shinde

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने अनोळखीचा मृत्यू

Rohan_P

`पदवीधर’ निवडणुकीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती शक्य

Abhijeet Shinde

Kolhapur; ‘सीपीआर’ला हवीय ई-ऍम्ब्युलन्स.!

Abhijeet Khandekar

आजरा आगारातील 122 कर्मचारी कर्तव्यावर हजर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात रूग्ण दीडशे, कंटेन्मेंट झोन पाच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!