प्रतिनिधी /पणजी
दुचाकी वाहन उत्पादनातील अघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर्सने शुक्रवारी गोव्यात दर्जात्मक ऑन-रोड मायलेज देणाऱया नवीन आयक्यूब इलेक्ट्रिक स्?कूटर सिरीजचे अनावरण केले. सुमारे 180 इंटेलिजण्?ट कनेक्टेड वैशिष्?टय़ांनी युक्त असलेल्या या स्?कूटर्समध्?ये 7 इंच टीएफटी टचस्क्रिन, क्लीन यूआय, अनेक थीम वैयक्तिकरण, वॉईस असिस्?ट व ऍलेक्सा स्किलसेट, सर्वोत्तम म्युझिक प्लेअर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, चार्जरसोबत प्लग-ऍण्?ड-प्ले कॅरी चार्जिंग, सेफ्टी नोटिफिकेशन्स, ब्ल्यूटूथ व क्लाऊड कनेक्टिव्हीटी पर्याय, 32 लिटर स्?टोरेज स्?पेस, आदींचा समावेश आहे.
त्यानिमित्त पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीचे ईव्ही विक्री व्यवस्थापक निखील तनेजा यांनी ही माहिती दिली. त्यावेळी निकिता वर्मा यांची उपस्थिती होती. 11 रंग व 3 चार्जिंग पर्यायांसह 3 व्हेरिएण्?टसमध्?ये या स्कूटर्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात आयक्यूब एस, आयक्यूब बेस आणि आयक्यूब एसटी या व्हेरिएंटस्चा समावेश आहे. पहिल्या दोन व्हेरिएंटस्मधील स्कूटर्स प्रत्येकी 100 किमी मायलेज देतात तर एसटी व्हेरिएंटस्ची मायलेज 140 किमी एवढी आहे. 32 लिटरच्या सीट स्?टोरेजखाली चक्क दोन हेल्मेटस् ठेवण्याची सुविधा यात देण्यात आली आहे.
आयक्यूब एस व बेससाठी कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग्ज सुरू करण्यात आली आहे तर आतापर्यंत काही स्कुटर्सची ग्राहकांना डिलिव्हरीही करण्यात आली आहे, दोन्ही स्?कूटर्स देशातील 85 शहरांमधील 165 डिलरशिप्समध्?ये उपलब्?ध आहेत. आयक्यूब एस आणि बेस मॉडेलच्या स्कुटर्सची किंमत अनुक्रमे 118372 रूपये व 126315 रूपये असल्याची माहिती तनेजा यांनी दिली.