तेल अवीव
इस्रायलमध्ये स्वातंत्र्य दिनादरम्यान हिंसक हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. हा हल्ला संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपल्यानंतर हा हल्ला झाला आहे. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले तरी हल्लेखोरापासून बचावासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. तथापि, पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून पंतप्रधान बेनेट यांनी हल्लेखोरांना मोकळे रान दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.