नयागड :
ओडिशाच्या नयागड जिह्यात एका खासगी कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघातात तीन मुलींचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना दासपल्ला परिसरातील सहलभंगा भागात घडल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.