प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 19 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सदर माहिती देण्यात आली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 738 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून मृतांचा सरकारी आकडा 1 हजार 6 इतका आहे.