Tarun Bharat

तीन दहशतवाद्यांना शोपियानमध्ये अटक

शस्त्रास्त्रांसह स्फोटकांचा साठा हस्तगत

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिह्यात दोन वेगवेगळय़ा कारवाईत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे सुरक्षा अधिकाऱयांनी सोमवारी सांगितले. रविवारी रात्री राबविण्यात आलेल्या पहिल्या विशेष मोहिमेदरम्यान अटक करण्यात आलेल्या दोघांचीही ओळख पटली आहे. गोहेर मंजूर आणि आकिब हुसेन नंदा अशी त्यांची नावे आहेत. ते पुलवामा येथील द्राबगामचे रहिवासी असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अन्य एका मोहिमेमध्ये शोपियानच्या मोहंदपूर येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवादी संशयितास पकडले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शोपियानमधील चक केलेर भागात दोन दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रविवारी संध्याकाळी लष्कराच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली. संयुक्त मोहिमेदरम्यान रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक वाहन अडवण्यात आले. मात्र त्यातील प्रवाशांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Related Stories

गुणवत्तेच्या आधारावर सैन्यप्रमुखांची नियुक्ती?

Patil_p

टीव्हीएसच्या तांत्रिक सल्लागारपदी विश्वनाथन

Patil_p

बिहार : राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध

datta jadhav

सिसोदियांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

Patil_p

देशात 50,357 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

शिरोमणी अकाली दल अन् बसप एकत्र

Patil_p