► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे कारनामे सुरू असल्याचा प्रकार उघड झाला. श्रीनगरमध्ये पोलिसांनी 3 हायब्रिड दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या आयजींनी रविवारी सायंकाळी दिली. तिन्ही दहशतवाद्यांवर पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद हाफीज चाक यांच्यावर 9 डिसेंबर रोजीच्या घटनेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. अन्य एका घटनेत जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. रस्ता ऊंदीकरणाचे काम सुरू असताना भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सेल्फ-लोडिंग रायफल, लाइट मशीन गन आणि काडतुसे जप्त केली आहेत.
9 डिसेंबर रोजी सुरक्षा दलाच्या एका पथकावर झालेल्या हल्ल्यात 6 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात 3 कॉन्स्टेबल जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणीच सुरक्षा यंत्रणांनी विशेष शोधमोहीम राबवत तिघांना अटक केली आहे.