मालवण / प्रतिनिधी–
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच दही हंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे, त्या पार्श्व भूमीवर कॉलेजच्या जिमखाना आणि सांस्कृतिक विभागाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी दोन दहीहंडीचे आयोजन केले होते. यामध्ये उत्स्फूर्तपणे 63 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. दही हंडी फोडण्यामध्ये आधी मुलींनी बाजी मारली. त्यानंतर काही वेळाने मुलांनी दहीहंडी फोडली.
जिमखाना विभाग प्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. पायल शिरपुटे, प्रीती बांदल, तेजल शिरपुटे, पूर्वा कोयंडे, ऋतिकेश सावंत, तेजस शेडगे, पूर्वा वेंगुर्लेकर, सुशील पाताडे, हितेश वायंगणकर, ऋषिकेश सामंत, अर्जुन मालवणकर इत्यादी विद्यार्थ्यानी जिमखाना आणि सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले.