पुणे / प्रतिनिधी :
Thunderstorm warning for the state राज्यातील अनेक भागांत पुढील तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह, मुसळधार वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारीही अनेक राज्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली.
बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टीजवळ हवेची द्रोणीय स्थिती आहे. कर्नाटक तसेच बंगालच्या उपसागरादरम्यान ट्रफची स्थिती आहे. यामुळे बंगालच्या उपसागराकडून जमिनीवर मोठय़ा प्रमाणात बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्यांमुळेच राज्यात पुन्हा पाऊस परतला आहे. गुरुवारी नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्हय़ांत वादळी पाऊस झाला. बहुतांश भागात सायंकाळनंतर ढगाळ वातावरण होत असून, सोसाटय़ाचा वारा व वादळी पाऊस होत आहे. विदर्भातील अनेक जिल्हय़ांना पावसाने झोडपले आहे.
अधिक वाचा : …तर सेना दुर्बिणीने शोधावी लागेल, सत्तारांचा उद्धव ठाकरेंना इशारा
तीन दिवस पाऊस कायम
पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यात मध्य महाराष्ट्र व कोकणातील जिल्हय़ांत वादळी पाऊस होईल, तर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.